मानवी भाषा आणि तंत्रज्ञान यांचे अतूट नाते आहे. भाषेचा विकास तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होतो आणि तंत्रज्ञान जसे विकसित होईल, तशी भाषाही विकसित होत जाते. भाषा व तंत्रज्ञान यांचा संबंध हा आशय व अभिव्यक्तीच्या साधनांमधला संबंध आहे. आधुनिक काळातील संगणकात माहिती साठवण्याचे जे तंत्रज्ञान आहे, तसेच हे तंत्रज्ञान मानवी मेंदूत माहिती साठवण्याचेही आहे. आपल्या अभिव्यक्तीसाठी भाषेमागचे तंत्रज्ञान सतत विकसित होत गेलेले आहे. हे तंत्रज्ञान भाषेच्या अभिव्यक्तीत इतके एकरूप झाले आहे की, हे ’तंत्रज्ञान’ आहे हेच आपण विसरून गेलो आणि तंत्रज्ञानाच्या वापराविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले. आधुनिक कालखंडात मराठी भाषेला ज्ञानभाषा बनायचे असेल तर तिने तंत्रज्ञानाचा वापर करून अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाची कास धरूनच मराठी भाषेला आपला विकास करणे शक्य होईल.
Copyright © 2025 IJRTS Publications. All Rights Reserved | Developed By iNet Business Hub