मराठी शाहिरी आणि शाहिरांविषयीचा जुन्यात जुना निखित पुरवा म्हणून रामदेवराव यादव राजाच्या दरबारात आलेल्या इंस्तांम्बूलच्या प्रवाशाच्या प्रवासवृत्तातील निर्देश होय. त्यानंतरचा चरित्रात्मक ग्रंथातील पुरावा म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर यांचे गुरु श्री. गोविंद प्रभु चरित्रातील होय. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतही याच प्रकारच्या नृत्य, नाट्य, संगीत प्रधान लोकरंजन करणाÚया गायक स्त्रिचे चित्र दिसते. या सर्व ग्रांथिक उल्लेखांवरुन यादव काळात नृत्य, नाट्य, संगीतप्रधान गीत शाळा होत्या. यादव दरबारी व गावागावात नृत्य, नाट्याचे कार्यक्रम करणारा कोल्हाटिकांचा वर्ग होता. तो दर गुरुवारी राजदरबारी जलसे करी. त्याबद्दल राजा त्यांना बिदागी देई. असे हे आधुनिक मराठी शाहिरी जलसेशी समांतर असलेले हे कार्यक्रम असले तरी त्यांना त्यावेळी शाहिरी हे नांव असल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांचे त्यावेळचे विशेषनाम शोधावे लागेल. त्याचा शोध घेण्यापूर्वी शाहीर हे विधीनाम लिखित स्वरुपाचे कोठे सापडते ते पाहिले पहिजे? तसा एक पुरावा डाॅ. सूर्यकांत खंडेकरांनी ‘मराठी पोवाडा’ या प्रबंधात सादर केला आहे.1 त्यांच्या मते शाहिरांचा जुन्यात जुना उल्लेख महिकावतीच्या बखरीत सापडतो. यावरुन त्यांनी जरी शाहीर व शाहिरी ही विशेषनामे इ. स. 11 व्या शतकातील गृहित धरली तरी महिकावतीच्या बखरीचा कालच विवाद्य आहे. या बखरीचा उत्तरार्ध 14 व्या शतकातील ठरतो.
Copyright © 2025 IJRTS Publications. All Rights Reserved | Developed By iNet Business Hub