लोककथांचे कार्य काय आहे याबाबत डॉ.प्रा. सुमन पाटील यांनी लिहिले आहे लोकरंजनाबरोबर लोकशिक्षणाचे कार्य या कथानी केले आहे.या कथा बोधवादाने जरी भारावलेल्या असल्या किंबहुना त्या अप्रत्यक्षरित्या जीवनातील सुसंगत नीतीचा पाठपुरावा करीत असल्या तरी त्या रूक्ष नाहीत किंवा बोजड नाहीत रंजन हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे लोककथातून अभिव्यक्त होणारी संस्कृती ही काहीशी भिन्न असली तरी ती निसर्गाला जवळची असते. मानवी मनाची अभिव्यक्ति असते. जे बाहय निसर्गाशी एकरुप झालेले असते.या तादात्म्य पावलेले असते. वामन चोरघडे म्हणतात. लोककथा म्हणजे मनुष्य जातीचे जुन्यातले जुने आणि अत्यंत व्यापक असे जीवन रहस्य होय. मानवी जीवनाला बल देणा-या लोककथांचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे.
Copyright © 2025 IJRTS Publications. All Rights Reserved | Developed By iNet Business Hub