जगातील माणसांना आणि त्यांच्या एकूणच भावविष्वाला बांधून ठेवण्याचे सामर्थ्य हे केवळ साहित्यात आणि त्या त्या समाजसापेक्ष भाषेतच आहे. कारण त्यात जाणीवा असतात. साहित्य नेहमी जनकल्याणाचा विचार करते. माणसा माणसातील दुवा भाषा आणि साहित्य साधत असते. ते समाजातून समाजासाठीच निर्माण झालेले असते. व्यक्ती याच समाजाचा घटक असते. मानुशता हा साहित्याचा आणि भाशेचा सुध्दा धर्म आहे. साहित्य ही एक कला आहे.या कलेची भाषा शब्दांबरोबरच भावभावंनांची सुध्दा आहे.म्हणून तिचे अध्यापन मूर्त पातळीवर करण्यासाठी शिक्षकाकडे किंवा प्राध्यांपकांकडे अधिक कौशल्य लागते किंवा असलेली कौशल्ये पणास लावण्याचे सामर्थ्य असावे लागते.
Copyright © 2025 IJRTS Publications. All Rights Reserved | Developed By iNet Business Hub